4 |
सर्व याजक आणि लेवी यांना त्याने एकत्र बोलावले आणि मंदिराच्या पूर्वेकडील मोकळ्या चौकात त्यांची सभा घेतली. हिज्कीया त्यांना म्हणाला, “लेवी हो, ऐका, देवाच्या सेवेसाठी शुचिर्भूत व्हा. या पवित्र कार्यासाठी परमेश्वर देवाच्या मंदिराची सिध्दता करा. परमेश्वर हा आपल्या पूर्वजांनी मानलेला देव आहे. ज्या वस्तूं इथल्या नाहीत त्या इथून काढून टाका. त्या वस्तू म्हणजे घाणा असून त्या हे पवित्र मंदिर भ्रष्ट करतात.
|
12 |
तेव्हा जे लेवी कामाला लागले ते पुढीलप्रमाणे: कहाथ घराण्यातले अमासयचा मुलगा महथ आणि अजऱ्याचा मुलगा योएल. मरारी कुळातला अब्दीचा मुलगा कीश आणि यहल्लेलेलाचा मुलगा अजऱ्या.गर्षोनी कुळातला जिम्माचा मुलगा यवाह आणि यवाहचा मुलगा एदेन, अलीसाफानच्या घराण्यातील शिम्री आणि ईएल आसाफच्या घराण्यातील जखऱ्या व मत्तन्या. हेमानच्या कुळातील यहीएल आणि शिमी,येदुथूनच्या कुळातील शमया आणि उज्जियेल.
|
23 |
यानंतर याजकांनी राजा व समुदाय यांच्यापुढे बोकडांना आणले. हे बोकड पापार्पणासाठी होते. याजकांनी बोकडांवर हात ठेवून त्यांना मारले. बोकडांचे रक्त वेदीवर शिंपडून याजकांनी पापार्पण केले. परमेश्वराने इस्राएल लोकांना क्षमा करावी म्हणून हे विधी याजकांनी केले. सामस्त इस्राएल लोकांसाठी होमार्पण आणि पापार्पण करावे अशी राजाची आज्ञा होती.
|